नक्षलग्रस्त भागातील विकासकामांसाठी राज्याचे विशेष पथक, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-shinde

नक्षलग्रस्त भागांत रस्ते बांधण्यासाठी 864 कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव तयार आहेत. मात्र ही कामे करताना अडथळे निर्माण केले जातात. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) धर्तीवर राज्याचे विशेष पथक स्थापन करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यालयाच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी गोडलवाही या नक्षलग्रस्त भागातील आऊटपोस्टला भेट दिली. तिथे महाराष्ट्र पोलिसांसह बंदोबस्तावर तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि एसआरपीच्या जवानांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भासह गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन केले आहे. नक्षलवादाचा बीमोड करून इथल्या बांधकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.