घर खरेदीला प्रोत्साहन देणारे धोरण जाहीर करा! विकासकांची पंतप्रधानांकडे मागणी

280

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला पुन्हा उभारी देण्यासाठी घर खरेदीला प्रोत्साहन देणारे धोरण जाहीर करा, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातील सर्केच्च संस्था असलेल्या ‘क्रेडाई’ने केली आहे. त्यासाठी गृहकर्जाचा व्याजदर पाच टक्क्यांपर्यंत आणा, 24 महिन्यांचे हप्ते माफ करा आणि जीएसटीमध्ये सकलत द्या, अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था खरेदी या मूलभूत तत्त्वावर चालते. त्यामुळे घरखरेदीला पुन्हा चालना मिळाल्यास रीअल इस्टेट क्षेत्र पुन्हा बहरेल. या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाल्यास त्याला पूरक असलेल्या 300 क्षेत्रांना चालना मिळेल आणि देशभरात पाच कोटींहून अधिक रोजगारांची निर्मिती होऊ शकेल, असे क्रेडाई कृती समितीचे प्रवक्ते अजय अशर यांनी म्हटले आहे. क्रेडाईने स्थापलेल्या समितीने रीअल्टी क्षेत्रातील अडचणींकडे तातडीने लक्ष देण्यासाठी पंतप्रधान, अर्थमंत्री आणि आरबीआय यांना संबोधून एक ऑनलाईन याचिका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या