
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष गगन हाडा, लव जाधव, नितीन लोखंडे अजय निकम, निखिल तुपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच बरोबर भाजपचे रणजित महाले यांनीही कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गगनजी हाडा व इतर 150 कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून भगवा ध्वज हातात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे रणजित महाले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास माजी .नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्थ भाजपाचे नेते सचिन तांबे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख अस्लम शेख, दिलीप कानडे, उपशहरप्रमुख कालविंदर दडियाल यांच्यासह मअसंख्य मान्यवर व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


























































