राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp

राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या याादीमध्ये 77 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे.

रोहित पवारांना शह, उदयनराजे राम शिंदेंच्या प्रचाराला येणार?

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, रोहित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.

अजित पवार यांना बारामतीमधून, धनंजय मुंडे यांना परळीमधून, रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमधून, छगन भुजबळ यांना येवलामधून, नवाब मलिक यांना अणुशक्ती नगर येथून (मुंबई उपनगर) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीमधून अजित पवार विरुद्ध गोपिचंद पडळकर, परळीतून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा चुरशीचा सामना रंगताना दिसणार आहे.