मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसणार ते सांगितले नव्हते – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या मंत्री जयंत पाटील यांनीही जोरदार टोलेबाजी केली. फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असे सांगितले होते, पण कुठे बसेन ते सांगितले नव्हते, असे जयंत पाटील यांनी सांगताच सभागृहात हास्यस्फोट झाला. ते पुढे म्हणाले, फडणवीसांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. आता पुढची पाच वर्षे त्यांनी इकडे येण्याचा प्रयत्न करू नये. फडणवीस यांनी पाच वर्षे चांगलं काम केले. पूर्ण झालेली कामे आापण एकत्र गाडीत बसून बघू, असे फडणवीस तेव्हा म्हणाले होते. आता आमचे सरकार असून आता हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. तेव्हा माझ्या गाडीतून विरोधी पक्षनेत्यांसह पाहणी करू, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याआधी प्रसिद्धीप्रमुख होते. त्याचा फायदा त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर करून घेतल्याचाही चिमटा काढला.