तटकरेंना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रकाश देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना धक्का बसला असून प्रदेश चिटणीस प्रकाश देसाई यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून देसाई हे पुन्हा स्वगृही परतले आहेत.

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर अंतर्गत कुरघोडीमुळे पुन्हा देसाई हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मुंबई येथील कार्यालयात प्रकाश देसाई यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अॅड. राजीव साबळे, रोहा तालुका प्रमुख समीर सकपाळ, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.