Sharad Pawar Health Update – शरद पवार यांना डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. पुण्याच्या रूबी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून ते उपचार घेत होते मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्जार्ज दिला आहे.

छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे 22 फेब्रुवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि मित्र विठ्ठल मणियार होते.