चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा नगरमध्ये निषेध, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद शनिवारी नगर शहरात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अंबादास गारुडकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्ञानदेव पांडूळे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे आदींसह राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.