
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक होणार असल्याने ते अटकेला घाबरले होते. ते मातोश्रीवर येऊन रडत होते. त्यासाठी ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. आदित्य ठाकरे जे सत्य आहे तेच बोलले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या, ‘मला जे आदित्य ठाकरे माहिती आहेत. ते आदित्य ठाकरे खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे मातोश्रीवर काय झालं होतं, ते आदित्य ठाकरे खरंच सांगतील’, असे त्यांनी म्हटले आहे.




























































