राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदार अपात्रतेची आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी उद्या, शुक्रवार दुपारी 12 वाजाल्यापासून सुरू होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्यासमोर विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होईल.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांच्याविरोधात तर जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

विक्रोळी मतदारसंघातील मुंबई महानगरपालिकेच्या आम्रपाली सदन इमारतीचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते दत्ता दळवी, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, विधानसभाप्रमुख परम यादव, उपविभाग संघटिका रश्मी पहुडकर, शाखाप्रमुख अभय राणे, शाखाप्रमुख बाबू शिंदे, महिला शाखा संघटिका सुनीता सांगडे, शाखा संघटक प्रशांत दास, संदेश परब यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.