World Cup 2023 – खेळ आकडय़ांचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहलीने मिचेल मार्शचा अफलातून झेल टिपताना वर्ल्ड कपमधील आपला 15 वा झेल टिपत सर्वाधिक झेल टिपणारा हिंदुस्थानी क्षेत्ररक्षक ठरला. अनिल कुंबळेचा 14 झेलांचा विक्रम आज त्याने मोडला.

रोहित शर्माने वयाच्या 36 वर्षे 161 दिनी हिंदुस्थानी संघाचे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करत मोहम्मद अझरुद्दीनचा 36 वर्षे 124 दिनी नेतृत्व केल्याचा विक्रम मागे टाकला. आता रोहित हिंदुस्थानचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.

श्रीलंकेपाठोपाठ (167) ऑस्ट्रेलियाविरुद्धही 150 वा वन डे सामना खेळण्याचा पराक्रम केला. यानंतर विंडीज (142) आणि पाकिस्तानविरुद्ध (134) हिंदुस्थानी संघ सर्वाधिक वन डे खेळला आहे.

मिचेल स्टार्कने आपल्या 19 व्या वर्ल्ड कप सामन्यात आपल्या विकेटचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने वेगवान अर्धशतक साजरे करताना लसिथ मलिंगा (25), ग्लेन मॅकग्रा (30), मुरलीधरन (30) आणि वसीम अक्रम (32) यांना मागे टाकले. तसेच तो वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणारा पाचवा गोलंदाजही ठरला. स्टार्कने इशानचा विकेट घेत 941 व्या चेंडूंवर बळींचे वेगवान अर्धशतक साजरे केले.

World Cup 2023 – विराट-राहुलचा स्वर्गानंदी खेळ

डेव्हिड वॉर्नरने आज आठवी धाव काढताच 19 व्या सामन्यांत वर्ल्ड कपची हजारावी काढत वेगवान हजारीचा विक्रम रचला. सचिन आणि एबी डिव्हिलियर्सच्या 20 सामन्यांचा विक्रम त्याने मागे टाकला. तो वर्ल्ड कपमध्ये हजार धावा करणारा 18 वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला.

World Cup 2023 – ध्येय दुसऱ्या विजयाचे, आज न्यूझीलंडची गाठ नेदरलॅण्ड्सशी