एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणय रॉय यांना परदेशात जाण्यापासून रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांना आज परदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले. मनी लाँडरिंगप्रकरणी सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळेच सीबीआयच्या निर्देशानुसार दोघांना रोखल्याचे एअरपोर्ट ऍथॉरिटीने स्पष्ट केले आहे. प्रणय राय आणि राधिका रॉय आज मुंबई विमानतळावरून नौरोबी या देशात निघाले होते. तसेच ते 15 ऑगस्ट रोजी परत येणार होते, मात्र एअरपोर्ट ऍथॉरिटीने सीबीआयच्या निर्देशाचा हवाला देत त्यांना रोखले. याबाबत एनडीटीव्हीने तीक्र शब्दांत निषेध केला असून हा मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला प्रणय रॉय आणि राधिका रॉय दोघेही पूर्ण सहकार्य करत आहे. सीबीआयने उचललेले हे पाऊल म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.