
संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याची लगबग सुरू झाली असतानाच आज नगर शहरामध्ये एका तरुणाचा मांजाने गळा कापल्याची घटना घडली आहे. त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
धीरसिंग कल्याणसिंग राजपूत (वय 19) असे जखमी तरुणाचे नाव आहे. धीरसिंग हा बालिकाश्रम रस्त्यावरून जात असताना पतंगाच्या मांजामुळे त्याचा गळा कापला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

































































