‘नीट’ परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल येत्या 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी आपला निकाल ntaneet.nic.in या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत.

कोरोना संकटामुळे जे विद्यार्थी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेला बसू शकलेले नाहीत त्यांची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी घेण्याचे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा कोरोनामुळेच नीट आणि अन्य स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला आहे.