दोन महिन्यांपूर्वी बाटलीमध्ये अडकले प्रायव्हेट पार्ट, सडायला लागल्यावर गेला डॉक्टरकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टीलची बाटली वापरून हस्तमैथून करणे एका 45 वर्षीय व्यक्तीला महाग पडले आहे. त्या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट बाटलीमध्ये अडकला व त्यामुळे पुढे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रायव्हेट पार्ट बाटलीमधून निघत नसल्याने त्याने दोन महिने ती बाटली तशीच ठेवली मात्र नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट सडू लागल्याने तो डॉक्टरकडे गेला.

नेपाळमधील खुदला गावात ही घटना घडली. सदर व्यक्ती मानसिक रुग्ण असून तो त्याला बॉटलने लैंगिक सुख मिळवायची सवय होती. बऱ्याचदा तो प्लास्टिकच्या बाटली वापरायचा. मात्र दोन महिन्यांपूर्वी त्याने स्टीलची बॉटल वापरली. त्या बाटलीने लैंगिक सुख मिळवत असताना त्याचे गुप्तांग त्यात अडकले. त्याने बरेच प्रयत्न करूनही ते निघाले नाही. त्यानंतर त्याने लाजेखातर ती बाटली तशीच ठेवली. अशा प्रकारे त्याने दोन महिने काढले. तो सू देखील त्या बाटलीतच करत होता.

काही दिवसांनी त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली व त्याचे गुप्तांगही दुखू लागले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की गुप्तांग सडू लागलं आहे. त्यानंतर काहीच पर्याय नसल्याने तो डॉक्टरकडे गेला. तो प्रकार पाहून डॉक्टरही हादरले. त्यानंतर डॉक्टरांनी कटरने ती बाटली कापली व त्यांच्या गुप्तांगावर उपचार केले.