नेपाळने हिंदुस्थानसह सहा देशांमधील राजदूतांना माघारी बोलावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळने हिंदुस्थानसह सहा देशांतील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले असून, या सर्वांची नियुक्ती मागील के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली होती.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील राजदूतांना माघारी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी दिली.

माघारी बोलावण्यात आलेल्यांमध्ये शंकर प्रसाद शर्मा (हिंदुस्थान), चित्रलेखा यादव (ऑस्ट्रेलिया), सुम्निमा तुलाधर (डेन्मार्क), पूर्ण बहादूर नेपाळी (श्रीलंका), शिवमाया तुम्बाहाम्फे (दक्षिण कोरिया) आणि कपिलमान श्रेष्ठ (दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.