
नेपाळची नवीन पिढी जेन-झी आता राजकारणात उतरणार आहे. जेन-झी गटाने पत्रकार परिषद घेऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. 5 मार्च 2026 रोजी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग काही ‘किमान अटी’ पूर्ण करण्यावर अवलंबून असेल. जेन-झी चळवळीचे नेते मराज ढुंगाना यांनी शनिवारी नवीन पक्षाचा अजेंडा सादर केला. ढुंगाना म्हणाले, ‘‘चळवळीशी संबंधित तरुणांना एकत्र करण्यासाठी पक्षाची स्थापना आवश्यक आहे.’’