वाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या ठार, मोहाची फुले वेचण्यासाठी गेले होते जंगलात

चंद्रपूर वाघाच्या हल्ल्यात काका पुतण्याचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार जंगलात ही घटना घडली आहे. कमलाकर ऋषी उंदिरवाडे व द्रुवास उंदिरवाडे अशी मृतांची नावे आहेत.

कमलाकर आणि द्रुवास आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मोहफुल वेचत असतानाच दोघांवर वाघाने हल्ला केला. या  हल्ल्यात दोघेही जागीच ठार झाले आहेत. वनपथक घटनास्थळी दाखल आहेत. जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढ झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या