
सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होणार असून त्यासाठी एनटीएने कडक नियम केले आहेत. ही परीक्षा देणाऱया उमेदवारांना इतर वस्तूंबरोबरच परीक्षा केंद्रात पाण्याची बाटलीही नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्या या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. फक्त मधुमेही उमेदवारांनाच पारदर्शक बाटलीमध्ये पाणी, औषधे आणि फळे नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
या वस्तूंनाही मनाई
स्टेशनरी, मोबाईल फोन, खाद्यपदार्थ, पेजर, कॅलक्युलेटर, कागदपत्रे, स्लाइड रूल्स, लॉग टेबल, कॅमेरा, टेपरेकॉर्डर, कॅलक्युलेटर असलेले इलेक्ट्रॉनिक घडय़ाळ, धातूच्या वस्तू.





























































