युजर्सना बनावट नेटफ्लिक्स साईटवर नेऊन क्रेडिट कार्डची चोरी

सायबर भामट्यांचा नवीन फिशिंग घोटाळा समोर आला आहे. युजर्संना नेटफ्लिक्स साइटवर नेऊन ते भामटे संबंधितांच्या क्रेटिड कार्डचा तपशील आणि अन्य माहिती चोरत आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सचा वापर करणार्‍यांनी कोणत्याही भुलथांपाना बळी पडू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

युजर्संना त्यांच्या बिलिंगसंबंधित ईमेल पाठविले जातात. त्यात तत्काळ बिल भरा अन्यथा 24 तासात नेटफ्लिक्सची सदस्यता रद्द करण्यात येईल असे सांगितले जाते. बिल भरण्यासाठी तेथे एक लिंक देखील दिली जाते. ज्यामुळे अनेक जण त्यांचे बिल भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करतात. जर त्या लिंकवर क्लिक केले कि त्या युजरला नेटफ्लिक्सच्या बनावट वेबसाईटवर नेले जाते. मग वापरकर्त्याला त्याचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्र, बिलिंगचा पत्ता आणि क्रेटिड कार्डचा तपशील भरण्यास सांगितले जाते.  युजरने सांगितल्याप्रमाणे माहिती दिल्यानंतर त्याला पून्हा नेटफ्लिक्सच्या अधिकृत वेबसाईटवर नेले जाते आणि अशाप्रकारे भामटे फिशिंगचे जाळे पूर्ण करतात. अशाप्रकारे नेटफ्लिक्सच्या युजर्संना पद्धतशीरपणे त्याच्या नकळत त्यांच्या क्रेटिड कार्डची चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या