मुंबईत कोरोनाचे 14 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 14 रुग्ण सापडले तर सुदैवाने एकही मृत्यू झाला नाही. त्यापैकी 10 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तर 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना नियंत्रणात असल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या आणि मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 2 हजार 782 चाचण्या करण्यात आल्या असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे 98.3 टक्के आहे.