मध्य प्रदेशमध्ये उद्घाटनापूर्वीच पुलाला जलसमाधी, कोटी रुपये ‘पाण्यात’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये एक पुल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाला होता. त्याचे औपचारिक उद्घाटनही बाकी होते परंतु मुसळधार पावसामुळे हा पुल कोसळला आहे. त्यामुळे या पुलासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत.

मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात 3 कोटी 7 लाख रुपये खर्च करून वैनगंगा नदीवर एक पुल उभारण्यात आला होता. 1 सप्टेंबर 2018 रोजी या पुलाचे काम सुरू झाले होते. 30 ऑगस्ट रोजी या पुलाचे काम संपणार होते. यापूर्वीच या पुलाचे का पूर्ण झाले आणि नागरिकांनी हा पुल वापरण्यास सुरूवातही केली होती. या पुलाचे औपचारिक उद्घाटनही बाकी होते. पण काही दिवसांतच हा पूल नदीत कोसळला आहे. म्हणून या पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

हा पुल सिवनी विधानसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचे आमदार भाजपचे असून त्यांचे नाव राकेश पाल आहे. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची चौकशीचे आदेश दिले असून तपास सुरू आहे. हा पुल तुटल्यामुळे स्थानिक नागरिकांशी संपर्क तुटला आहे. तसेच ग्रामस्थांना त्याचा मनस्तापही होत आहे.