
थिएटर सुरू झाल्यानंतर अभिनेता प्रथमेश परबच्या चित्रपटांचा धमाका होणार आहे. प्रथमेशचे सलग सहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘डार्लिंग’, ‘टकाटक 2’, ‘लव सुलभ’, ‘ढिशक्यांव’, ‘टाइमपास 3’ या चित्रपटांच्या यादीत त्याचा ‘एक नंबर’ हा नवा कोरा सिनेमादेखील येत आहे.
सोशल मीडियावर नुकताच ‘एक नंबर’ या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या ‘दगडू’चे एकामागून एक रॉम-कॉम चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रथमेश मराठी बॉक्स ऑफिसवर एक नंबर ठरणार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

























































