
सामना ऑनलाईन । मुंबई
मॅरिएट इंटरनॅशनल आणि एएक्सएन, या सर्वोत्तम इंग्लिश मनोरंजन शोजच्या डेस्टिनेशनने एका खास भागीदारीसाठी सहयोग केला आहे. ते एकत्रितरित्या ‘एएक्सएन अल्टीमेट कुक ऑफ – द मॅरिएट चॅलेंज’ या खास स्वयंपाकाच्या शोचे आयोजन करत असून त्यातून प्रेक्षकांसाठी एक अनोखा, उत्साहाने भरलेला पाककलासंबंधित अनुभव दिला जाणार आहे. एएक्सएनकडून कुक-ऑफचा प्रीमियर १२ ऑक्टोबर रोजी सादर केला जाईल.
या शोमध्ये मॅरिएटमधील विविध ब्रँड्समधील चार मोठ्या शेफ्समधली अटीतटीची, उत्कंठावर्धक स्पर्धा दाखवली जाईल. यातील स्पर्धक विविध कलिनरी आव्हानांमधून आपली कौशल्ये प्रदर्शित करतील आणि त्यांची वैविध्यपूर्णता, सक्षमता व कलात्मकता यांच्यावरून त्यांना गुण दिले जातील. विजेती डिश हिंदुस्थानातील १०० पेक्षा अधिक मॅरिएट इंटरनॅशनल हॉटेल्सच्या मेन्यूमध्ये स्थान मिळवेल.
मॅरिएट कुटुंबातील ३० पेक्षा अधिक ब्रँड्सचे नेतृत्व करणारे शेफ टोइन होकसेल, वरिष्ठ कलिनरी संचालक, आशिया पॅसिफिक, मॅरिएट इंटरनॅशलन यांनी या स्पर्धेच्या परीक्षणासाठी हिंदुस्थानाला भेट दिली. इतर परीक्षकांमध्ये शेफ हिमांशू तनेजा, कलिनरी संचालक, हिंदुस्थान, मॅरिएट इंटरनॅशनल आणि ख्यातनाम अभिनेत्री व निर्माती चित्रांगदा सिंग यांचा समावेश होता.
मॅरिएट इंटरनॅशनल आणि एएक्सएनची भागीदारी नावीन्यपूर्ण कंटेंट व पाहुण्यांसाठी अविस्मरणीय अनुभव घेऊन येईल. प्रेक्षकांना एएक्सएनवरील सादरीकरणाद्वारे ५ महान मॅरिएट शेफ्सना जाणून घेण्याची संधी मिळेल. ते आपले ज्ञान आणि जेवणाबाबतचे प्रेम प्रेक्षकांना दाखवतील. याशिवाय, मॅरिएट इंटरनॅशनल हे या महिन्यात सोमवार ते शुक्रवारदरम्यान रात्री ९ वाजता आयोजित होणाऱ्या बहुप्रतीक्षित टॉप शेफ सीझन १४चे सादरीकरण प्रायोजक असतील.
summary-new cooking show on axn





























































