प्रतीक्षा संपणार, अखेर व्हॉट्सअॅप हे नवीन फिचर येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज वापरण्यात येणारे व्हॉट्सअॅप आता एक नवीन फिचर घेऊन येणार आहे. व्हॉट्सअॅप हे इतर सोशल मीडिया अॅप सारखे नाही, सुरक्षेच्या दृष्टीने त्याला बऱ्याच मर्यादा आहेत. हे अकाऊंट आपण फेसबुकसारखे अनेक डिव्हाइसवर वापरू शकत नव्हतो. व्हॉट्सअॅप हे एका अकाऊंटला एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसमध्ये ते वापरू शकतो. काही वेळा असे ही होते की, दोन वेगवेगळे स्मार्टफोन किंवा स्मार्टफोन व टॅब आपण वापरतो. अशा परिस्थितीत आपल्याला व्हॉट्सअॅपसाठी एक प्रायमरी फोन वापरावा लागतो.

काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. ज्यामध्ये व्हाट्सअॅप मध्ये मल्टीडिवाइस सपोर्ट म्हणून नवीन फिचर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र WABetainfo च्या माहितीनुसार WhatsApp एक नवीन फिचर विकसित करणार आहे.

या वृत्तानुसार नवीन फीचरमध्ये एक व्हॉट्सअॅप अकाऊंटमध्ये एका पेक्षा जास्त डिवाइस जोडण्याचा एक पर्याय असेल. ऐवढेच नाही तर, एकाच वेळी वेगवेगळ्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप अकाऊंट चालवू शकतो. असे असलेतरी तुमची माहिती सुरक्षित राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. कारण यामध्ये असे सांगितले आहे की, नवीन फिचर असूनही चॅट संपूर्ण एन्क्रिप्टेड राहतील.

परंतु व्हॉट्सअॅपकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅप आयपॅड खास एक नवीन व्हर्जन तयार करत आहे. WABetainfo ने एका ट्वीट मध्ये असे सांगितले आहे की, मल्टी डिवाइस फीचरच्या अंतर्गत एकाच वेळी आयफोन आणि आयपॅडमध्ये व्हॉट्सअॅप एकाच अकाऊंटने चालवू शकता.