विमा कर्मचारी रंगले क्रिकेटमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती न्यू इंडिया अॅश्युरन्सची भव्य क्रिकेट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या वतीने 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस कw. देविदास खेडेकर स्मृती क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.

कर्मचाऱयांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देत असताना कर्मचाऱयांना विरंगुळा म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती, न्यू इंडिया अॅशुरन्स यांच्यातर्फे क्रिकेट सामने, हळदीकुंकू तसेच अन्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदाची क्रिकेट स्पर्धा म्हणजे न्यू इंडिया अॅश्युरन्स कर्मचाऱयांचा एक काwटुंबिक सोहळाच ठरला. यात मुंबईतील सर्व प्रादेशिक व विभागीय कार्यालयातील कर्मचाऱयांचा सहभाग होता. गेली तीन वर्षे कोविड निर्बंधांमुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता, पण या वर्षी हे क्रिकेट सामने झाले. पश्चिम रेल्वे मैदान, फिनिक्स मॉलसमोर, लोअर परळ येथे हे सामने दिवस-रात्र खेळविण्यात आले. यामध्ये महिला संघांचे सामने, तसेच आंतरविमा एलआयसी, न्यू इंडिया अॅशुरन्स, जनरल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, ईसीजी आणि न्यू इंडियातील एकूण 22 संघांचा सहभाग होता.

स्पर्धेला शिवसेना उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, समाजसेवक बाळा खोपडे तसेच न्यू इंडिया अॅशुरन्स पंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक वाय. के. सिमरे, महाव्यवस्थापक अमित मिश्रा, जीआयसीचे उपमहाव्यवस्थापक सचिन साळवी उपस्थित होते. या सामन्यांचे आयोजन सरचिटणीस दिनेश बोभाटे, कार्याध्यक्ष अजय गोयजी, तसेच राजेंद्र पांजरी, आल्हाद नाईक, राजेंद्र राणे, सचिन लोके, मंगेश कदम, अनिल शेकोकर, राजू रायकर, संजय सावंत, ललित अत्तावर, शशी कारशिंकर, अतुल खेडेकर, विलास परब, अशोक परब व इतर पदाधिकारी यांनी केले.

दि न्यू इंडिया अॅश्युरन्स पंपनी हिंदुस्थानातील सर्वात मोठी सर्वसाधारण विमा कंपनी आहे. या कंपनीत स्थानीय लोकाधिकार समिती अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चेक ऑफ 2022 (युनियनला मान्यता मिळण्याची निवडणूक) निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समितीच्या अधिपत्याखाली असलेली भारतीय विमा कर्मचारी सेनेला 26 राज्यांतील सर्व कार्यालयातून विमा कर्मचाऱयांनी प्रचंड मतांनी काwल देऊन म्हणजेच 51टक्के मेंबरशिप देऊन तीनही श्रेणीसह इतर मागासवर्गीय श्रेणीतही ऐतिहासिक व देदीप्यमान विजय मिळवून दिला. या विजयामुळे यंदाची स्पर्धा सर्वांसाठीच खास होती.