‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लावू’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. नुकतेच झी म्युझिकने हे गाणे रिलीज केले व ह्या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

हे गाणे अभिनेत्री मीरा जोशी व अभिनेता प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. चित्रपटाचे निर्माते दिपक रुईया, प्रदिप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत, त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे. कथा आणि दिग्दर्शन राजीव एस रुईया यांचे आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रस्तुतकर्ता व वितरक पेन इंडिया लिमिटेड आहे.

चित्रपटात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

summary- new song from mazya baykocha priyakar got hit