
कोरोना महामारीचे संकट घेऊन आलेल्या सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच येणाऱया नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येकाला वर्षभर उपयोगी पडणाऱया दिनदर्शिकांच्या छपाईची, प्रकाशनाची लगबग दिसत आहे. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांकडून या लोकोपयोगी दिनदर्शिका तयार केल्या असून मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कांजूर येथील वैश्यवाणी समाजाने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत नारकर, कार्याध्यक्ष सुधाकर पेडणेकर, सचिव रमेश हरयान, सभासद सुभाष कोठावळे, विजय कानडे, सुभाष जैतापकर, मयेश बंड, विधानसभा संघटक संदीप सावंत, शाखाप्रमुख प्रभू गवस, विठ्ठल परब आदी उपस्थित होते.

शिवसेना दिनदर्शिकचे प्रकाशन नुकतेच शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई हस्ते करण्यात आले. यावेळी मलबार हिल विधानसभेचे सह समन्वयक किरण बाळसराफ उपशाखाप्रमुख संजय जाधव , संतोष शेटय़े, रवींद्र भुवड, पृथ्वीराज चौहान, परशुराम, भूपेंद्र पटेल आदी उपस्थित होते.























































