नववर्ष स्वागतासाठी पश्चिम रेल्वेच्या मध्यरात्री आठ विशेष लोकल

पश्चिम रेल्वेने नववर्ष स्वागतासाठी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी विरार ते चर्चगेट चार आणि चर्चगेट ते विरार चार अशा एकूण आठ लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मरीन ड्राइव्ह तसेच गेट वे ऑफ इंडिया येथे नववर्ष स्वागतासाठी जाणाऱ्या मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.

अप मार्गावरील चार स्पेशल लोकल
विरार ते चर्चगेट अप मार्गावर स्पेशल-2 ही गाडी विरारहून मध्यरात्री 12.15 वा.सुटून चर्चगेटला मध्यरात्री 01.52 वा. पोहचेल. स्पेशल-4 ही गाडी मध्यरात्री 12.45 वा. विरारहून सुटून मध्यरात्री 2.22 वा. चर्चगेटला पोहचेल. स्पेशल-6 ही गाडी मध्यरात्री 1.40 वा. विरारहून सुटून मध्यरात्री 3.17 वा.चर्चगेटला पोहचेल. स्पेशल-8 ही गाडी विरारहून मध्यरात्री 3.05 वा.सुटून पहाटे 4.41 वा. चर्चगेटला पोहचेल.

डाऊन मार्गावरील चार स्पेशल लोकल
चर्चगेट ते विरार डाऊन मार्गावर स्पेशल-1 चर्चगेटहून मध्यरात्री 1.15 वा. सुटून विरार येथे मध्यरात्री 2.55 वा. पोहचेल. स्पेशल-3 चर्चगेटहून मध्यरात्री 2.00 वा. सुटून विरार येथे पहाटे 3.40 वा. पोहचेल. स्पेशल-5 चर्चगेटहून मध्यरात्री 2.30 वा.सुटून विरार येथे पहाटे 4.10 वा. पोहचेल. स्पेशल-7 चर्चगेटहून मध्यरात्री 3.25 वा.सुटून विरार येथे पहाटे 5.05 वा. पोहचेल.

आपली प्रतिक्रिया द्या