
‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्राने प्रथमच फक्त 15 महिलांची टीम अंतराळात स्पेसवॉक करायला पाठवण्याची योजना आखली आहे. या टीमचे नेतृत्व क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीर करणार आहेत. कारण या दोघींना यापूर्वीही स्पेसवॉकचा अनुभव आहे. येत्या 21 ऑक्टोबरला या 15 महिला अंतराळात तीन-तीन अशा गटांनी स्पेसवॉक करणार आहेत. यापूर्वीही ‘नासा’ने मार्च महिन्यात महिलांसाठी स्पेसवॉक कार्यक्रम योजला होता, पण त्यावेळी महिलांना फिट होतील असे स्पेससूट उपलब्ध न झाल्याने ती योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र आता तीच योजना नव्याने बनवण्यात आली आहे. या योजनेचे नेतृत्व करणाऱया क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर यांनी महिलांसाठी तीन स्पेससूट बनवले आहेत. त्यामुळे या तीन स्पेससूटद्वारेच एकेक गट स्पेसवॉक करून येणार आहे.






















































