
ते म्हणतात ना, कुंडली जुळली नाही तरी चालेल, पण वाईब जुळली पाहिजे! असाच वाईब्स जुळलेल्या एका जोडप्याच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या जोडप्याने ‘मराठमोळी.. थोडीशी साधीभोळी.. बायको पाहिजे नखरेवाली’ या गाण्यावर केलेल्या डान्सच्या स्टेप्स पाहून वऱ्हाडी थक्कच झाले. हा व्हिडीओ @surendraa__radhikaa या इंस्टाग्राम पेजवरून अपलोड करण्यात आला असून त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या गोड जोडप्याची प्रत्येक ओळीवरील सुंदर स्टेप, टायमिंग, हावभाव आणि अप्रतिम केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव केला आहे.




























































