
सामना ऑनलाईन । नोयडा
‘झी’ वृत्तवाहिनीच्या एका वृत्तनिवेदिकेचा नोयडातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. राधिका कौशिक असे त्या तरुणीचे नाव असून ती झी राजस्थानमध्ये कामाला होती. राधिकाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे की हा अपघात आहे हे सध्या पोलीस तपासत आहेत.
राधिकाचा सहकारी राहुल अवस्थी याचे ग्रेटर नोयडामधील अंतरिक्ष फॉरेस्टमध्ये घर आहे. गुरुवारी रात्री राधिका राहुलच्या घरी आली होती. तेथे ते दोघे दारू देखील प्यायले. दारू पिताना त्यांचे काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर रात्री 3.30 च्या सुमारास त्यांचे भांडण झाले. त्यानंतर काही वेळातच राधिका चौथ्या मजल्यावरून खाली पडली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल अवस्थी याची चौकशी केली असता त्याने राधिका पडली तेव्हा तो बाथरुमला गेला होता असे पोलिसांना सांगितले.



























































