शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी बुथप्रमुखांनी कामाला लागावे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भूम

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व बुथ प्रमुखांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन भूम – परंडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक संजय नटे यांनी केले.

भूम तालूक्यातील 5 जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावातील बुथ प्रमूखांशी चर्चा करून मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी प्रत्येक बुथ प्रमूखांनी आपल्या बुथवर जास्तीत जात मतदार नोंदणी करावी, मतदार यादीचा सखोल अभ्यास करून नावे वगळलेले मतदार, मयत मतदार याची जाणीव करून द्यावी, बाहेरगावाहून आलेल्या नविवाहीत मुलीची यादी तयार करून त्याची नोंद करुन घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. शिवसैनिकांनी शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाज कार्य आणि वीस टक्के राजकारण केले पाहिजे, प्रत्येक शिवसैनिकांनी गावामध्ये गोरगरीब लोकांची सेवा करुन वेळोवेळी गावातील आडीआडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा फडकवन्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनूसार बुथ प्रमुखांच्या बैठकांचे प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद गटात बैठका आयोजित करुन आभियान चालू केले आहे असेही ते म्हणाले.