
Nexzu Mobility कंपनीने हिंदुस्थानात आपली नवीन Roadlark Cargo इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही सायकल वस्तू डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकते. कंपनीने हल्लीच लॉन्च केलेल्या Nexzu Roadlark ई-सायकलवर ही आधारित आहे. आपण आज याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
या इलेक्ट्रिक सायकलवर 50 किलोग्रॅमपर्यंत वजन ठेवता येणे शक्य आहे, असा दावा Nexzu Mobility ने केला आहे. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकी आहे. ही एक मेड इन इंडिया सायकल असून यात ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे. यातली एक बॅटरी सायकलला फिक्स करण्यात आली आहे. तर दुसरी बॅटरी काढण्यायोग्य आहे. या दोन्ही बॅटरी 3 ते 4 तासात पूर्ण चार्ज होतात.
याच्या फिक्स बॅटरीची क्षमता 5.2Ah आहे आणि काढण्यायोग्य बॅटरीची 8.7Ah क्षमता आहे. या बॅटरी वॉल चार्जरद्वारे चार्ज करता येऊ शकतात. संपूर्ण चार्ज झाल्यावर ही सायकल 100 किमीचा पल्ला गाठू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने याची किंमत 42 हजार रुपये इतकी ठेवली आहे.




























































