
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाच्या अनुषंगाने शीव पुलावर गर्डर्स बसवण्यासाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री माटुंगा-कुर्लादरम्यान विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12.45 ते शनिवारी पहाटे 3.45 वाजेपर्यंत तसेच शनिवारी मध्यरात्री 12.10 ते रविवारी पहाटे 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.





























































