निलंगा येथील प्रलंबित 27 पैकी 16 पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ

2142

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथून पाठवण्यात आलेल्या 5 जुलै रोजीच्या स्वॅबपैकी 27 जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी तब्बल 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे निलंगा शहरच नव्हे तर तालूक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

5 जुलै रोजी निलंगा येथून 57 जणांचे स्वॅब लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यातील 30 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले होते परंतू २७ जणांचे अहवाल प्रलंबित होते. या प्रलंबित अहवालांपैकी तब्बल 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामध्ये शहरातील इंदिरा चौकातील 13 जणांचा समावेश आहे तर एकजण दत्त नगर येथील असून 2 कोरोना पॉझिटिव्ह निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील आहेत. यामुळे निलंगा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या