निलंगा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने केली नगरपरीषदेच्या आवारात आत्महत्या

लातूर जिल्ह्यातील नगर परिषद ही गेल्या एक ते दिड वर्षापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. आज एका कर्मचाऱ्याने चक्क नगरपरीषदेच्या आवारात आत्महत्या केल्याने शहरातच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बाबु गायकवाड यांनी गेल्या 30 वर्षांपासून  नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी कार्यालयाच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गायकवाड नगर परिषदेत कंत्राटी कामगार होते. एवढ्या वर्षानंतरही गायकवाड यांना कायमस्वरुपी सेवेत घेतले नसल्याची त्यांना खंत होती. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या