श्री वासुदेव स्वामींनी समस्त दत्तभक्तांच्या हृदयस्थानी असणाऱ्या नाममंत्राची निर्मिती केली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।

या मंत्रामध्ये पहिला दिगंबरा शब्द म्हणजे “खरा मी,” त्याचे अनुसंधान मी देह नाही, मी आहे आत्मा. तो आत्मा म्हणजे शुद्ध. अहम तो साक्षी आहे. निर्विकार आहे, आनंदस्वरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे.

दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तूत: ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत. त्या परब्रह्मालाच दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.

श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्री गुरू देवांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचे अवतार आहेत त्यांना संबोधन केलं आहे.

शेवटी जे दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे. “माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, मला मला लवकर आपल्या जवळ न्या, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या. मी देह असे जे मला वाटते आहे, तो माझा भ्रम आहे. तो भ्रम नाहीसा करा, अहं ब्रह्मास्मि हा अनुभव मला येऊ द्या, आपल्या सारखी दिगंबरा स्थिती मलाही द्या”, अशी प्रार्थना या दिगंबरा शब्दात केली आहे.