शिकवणी चालकाकडून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, कासार सिरसी येथे मूक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
woman

सामना प्रतिनिधी। निलंगा

निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे एका खाजगी शिकवणी चालकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित विदयार्थीनीला दिवस गेल्याने ही घटना उघडकीस आली आहे. सचिन स्वामी (35) असे या नराधमाचे नाव आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी याबाबत एक लेखी निवेदन पोलिसांना दिले.

सचिन कासार सिरसी येथे खाजगी शिकवणी घेतो. पीडित विद्यीर्थीनीही त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. याचदरम्यान त्याने तिला विशेष नोट्स देतो असे सांगून शिकवणी वर्गात थांबवले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबदद्ल कुठेही वाच्यता करू नकोस असेही धमकावले. त्यानंतर अत्याचारांची ही मालिका तीन महिने सुरूच होती. याचदरम्यान विद्यार्थीनीला दिवस गेले. याबद्दल तिने घरातल्यांना सांगितले.

पीडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन स्वामी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समाधान कवडे हे करीत आहेत.