‘द ग्रेट इंडियन किचन’फेम मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयनची मराठीत एण्ट्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘द ग्रेट इंडियन किचन’ या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ या चित्रपटात ती दिसणार असून हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपट इतर भाषेत भाषांतरित होऊन प्रदर्शित होत असताना दक्षिणेमधील उत्तम अभिनय करणाऱया कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड टिळेकर यांनी ‘हवाहवाई’ सिनेमातून सुरू केला आहे.

आशा भोसले यांचे गाणे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 88 व्या वर्षी ‘हवाहवाई’ चित्रपटातील एक गाणे गायले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत असल्याने कुतुहल आणखी वाढले आहे.