नऊ जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी 500 बेड वाढवणार! सुमारे 20 हजार बेड होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिकेच्या नऊ जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी 500 बेड वाढवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सर्व जम्बो कोविड सेंटर सज्ज असली तरी केवळ पाच सेंटरमध्येच रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने जम्बो कोविड सुरू करण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. बेड वाढवल्यास 20 हजार बेड सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत सद्यस्थितीत बाधितांमधील पाच टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असले तरी सध्याची रुग्णवाढ पाहता पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत नेस्को गोरेगाव फेज-1, बीकेसी, रिचर्डसन ऍण्ड क्रुडास मुलुंड, रिचर्डसन ऍण्ड क्रुडास भायखळा आणि सेव्हन हिल्स अशी जम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. दरम्यान, पालिकेने सद्यस्थितीत सुमारे 35 हजारांवर बेड ऑक्टिव्ह केले आहेत. यापैकी 85 टक्के बेड रिक्त आहेत.

जम्बो कोविड सेंटरची बेडसंख्या

  • दहिसर चेक नाका, कांदरपाडा – 700 बेड
  • मालाड जम्बो कोविड सेंटर – 2200 बेड
  • नेस्को गोरेगाव फेज-1 – 2221 बेड
  • बीकेसी कोविड सेंटर – 2328 बेड
  • कांजूरमार्ग कोविड सेंटर – 2000 बेड
  • शीव जम्बो कोविड सेंटर – 1500 बेड
  • आरसी भायखळा सेंटर – 1000 बेड
  • आरसी मुलुंड जम्बो सेंटर – 1708 बेड
  • एनएससीआय वरळी – एकूण 500 बेड
  • नेस्को गोरगाव फेज-2 – 1500 बेड (सद्यस्थितीत बंद)