धक्कादायक..! नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून

1851
murder

नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धामणगाव येथे घडली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्ज्वल गेमाजी खेडेकार असे मृत मुलाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धामणगाव येथिल जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या चिंचेचा झाडाखाली उज्वल गेमाजी खेडेकार या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उज्वलच्या गळ्याला दुपट्टा आवळलेला होता. दरम्यान घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या