‘निपाह’ व्हायरसची प्रकरणं वाढली; पुन्हा कोविडसारखी परिस्थिती? केरळमध्ये शाळा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गाच्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली असून एका 39 वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या सहा झाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या कार्यालयानं शुक्रवारी ही माहिती दिली.

हा रुग्ण रुग्णालयात निरीक्षणाखाली होता. त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते, जेथे निपाह-पॉझिटिव्ह रुग्णांवर यापूर्वी इतर आजारांवर उपचार केले जात होते, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनातून मिळते.

निपाह व्हायरसची एकूण प्रकरणे सहा आहेत, तर संसर्गामुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता सक्रिय प्रकरणे चार आहेत.

केरळमधील निपाहच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली.

फेसबुक पोस्टमध्ये, त्यांनी म्हटलं आहे की शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस ऑनलाइन वर्गांची व्यवस्था करू शकतात.

घाबरण्याची गरज नाही: केरळचे आरोग्य मंत्री

निपाहच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकही घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आणि वीणा जॉर्ज म्हणाल्या, ‘आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की सर्व संभाव्य प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही’.

मंत्री असंही म्हणाले की, डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून असं आढळून आलं आहे की फक्त कोझिकोड नाही तर संपूर्ण केरळ राज्याला असं संक्रमण होण्याची शक्यता आहे.

जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक खबरदारी घ्यावी लागते, असंही जॉर्ज म्हणाले आणि निपाह विषाणूचे ताजे प्रकरण जंगलाच्या पाच किलोमीटर परिसरात उद्भवले आहे.

कोझिकोड जिल्ह्यातील विलेपल्ली पंचायतीमधील तीन आणि पुरमेरी पंचायतमधील एक- आणखी चार वॉर्ड मंगळवारी जाहीर केलेल्या व्यतिरिक्त बुधवारी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले.

या आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन, कोझिकोड प्रशासनानं मंगळवारी सात ग्रामपंचायती-अटंचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टियाडी, कयाकोडी, विल्ल्यापल्ली आणि कविलुमपारा- कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले.