
>> डॉ. निरंजन नायक (सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, अपोलो डायग्नोस्टिक, पुणे)
पाचही प्रकारच्या (हिपॅटायटीस ए, बी, सी, डी, आणि ई) हिपॅटायटीस विषाणूंसोबतच, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एएफएलडी) या दोन्ही प्रकारांतील रुग्णांची वाढ झाली आहे. चिंतेची वाढती बाब अशी आहे की, यकृताचा आजार हा देशात जीवनशैलीचा आजार बनला आहे आणि दररोज यकृत विकाराची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. यकृताच्या आजारासाठी वेळेवर तपासणी केल्याने एखाद्याचे जीवनमान सुधारण्यासाठी त्वरित उपचार सुरू करण्यात मदत होऊ शकते.
एनएफएलडी हा सामान्य स्टिटोसिस (NAFL) पासून नॉन-अल्कोहोलिक स्टिटोहेपेटायटिस (NASH) पर्यंतच्या रोगांचा एक स्पेक्ट्रम आहे, जो प्रगत फायब्रोसिस (AF) आणि सिरोसिसमध्ये रूपांतरित होऊ शकतो. फॅटी लिव्हरचा आजार जास्त प्रमाणात चरबी साठल्यामुळे होतो ज्यामुळे यकृतावर डाग पडू शकतात. फॅटी लिव्हर हा एक सायलेंट किलर आहे. कारण यकृत खराब होईपर्यंत लक्षणे दिसत नाहीत.
ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत, मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉलच्या समस्या, थायरॉईड आणि स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांमध्ये हे दिसून येते. पोटदुखी, थकवा, अशक्तपणा आणि वजन कमी होणे ही एनएफएलडीची लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये डाग, यकृत निकामी होते. यकृत एंझाइम शोधण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफीद्वारे फॅटी यकृत शोधले जाऊ शकते. वेळेवर तपासणी, संतुलित आहार, दररोज व्यायाम करणे, दारू सोडणे आणि इष्टतम वजन राखणे यकृताच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणाच्या मोठया प्रमाणामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) मध्ये वाढ झाली आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या यकृतामध्ये चरबी जमा होते आणि आजकाल तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. यकृत कार्य चाचण्या (यकृत पॅनेल म्हणूनही ओळखल्या जातात) या रक्त चाचण्या आहेत ज्या यकृताद्वारे बनवलेल्या विविध एन्झाइम्स, प्रथिने आणि इतर पदार्थांचे मोजमाप करण्यात मदत करतात आणि यकृताच्या स्थितीचे निरीक्षण करण्यात मदत करतात. या घातक स्थितीतील व्यक्तीने वजन कमी करणे, दररोज व्यायाम करणे, ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे, जंकपूड, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळणे, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन, शर्करायुक्त पेयाचे सेवन टाळणे आवश्यक आहे.