हिंदुस्थानी पासपोर्टच्या आधारावर मोदी लंडनमधून पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला नीरव मोदी महिन्याभरापूर्वीच लंडनमधून पसार झाला आहे. तसेच तो हिंदुस्थानी पासपोर्टवरच जगभरात फिरत आहे, अशी खळबळजनक माहिती इंटरपोलने सीबीआयला दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी आपण अडचणीत येऊ शकतो हे समजल्यानंतर नीरव मोदी कुटुंबासह परदेशात पळून गेला. तेव्हापासून सीबीआय त्याच्या शोधात आहे. यासाठी त्याच्या शोरुम्सवरही छापे घातले होते. तो लंडनमध्ये असल्याची चर्चा होती. यामुळे सीबीआयने इंटरपोलला पत्र लिहले होते. त्यात नीरवच्या ठावठिकाण्यासंदर्भात माहिती देण्याबद्दल सांगण्यात आले होते. त्याला उत्तर देताना इंटरपोलने तो लंडनमध्ये नसल्याचा धक्कदायक खुलासा केला आहे. तसेच हिंदुस्थानी पासपोर्टवरच आतापर्यंत तो चार देश फिरल्याचेही इंटरपोलने सीबीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, नीरव राजकीय आधार मिळवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच तो जगभरातील वजनदार व्यक्तींच्या भेटी घेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या खुलाशानंतर सीबीआय परराष्ट्र मंत्रालयाकडेही याबद्दल चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.