नीरव मोदीचा फैसला 25 फेब्रुवारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँकेला कोटय़वधी रुपयांचा गंडा घालून लंडनला फरार झालेला कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा फैसला 25 फेब्रुवारीला होणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी शुक्रवारी निकालाचा दिवस निश्चित केला. त्यामुळे हिंदुस्थानी तपास यंत्रणांना लवकरच मोदीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

नीरव मोदीला 19 मार्च 2019ला अटक झाली होती. तेव्हापासून तो वाण्ड्सवर्थ तुरुंगात कैद आहे. येथून बाहेर पडण्यासाठी त्याने सहा वेळा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचे अर्ज फेटाळून लावले. पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटींच्या घोटाळ्याला नीरव मोदीच जबाबदार असल्याचे निरीक्षण लंडनच्या न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले