नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर 11 मेपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता

201

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर 11 मे 2020 पासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी या तारखेला मंजूरी दिल्यानंतर न्यायलय यावर अंतिम निर्णय घेईल असे समजते.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर सुनावणीसाठी एक तारिख निश्चित करण्यात येणार असून ती तारिख दोन्ही बाजूच्या वकिलांना मान्य असेल तर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान नीरव मोदीच्या वकिल जेसिका जोन्स यांनी न्यायालयात प्रत्यार्पणाच्या याचिकेसाठी मे 2020 ची तारिख द्यावी असे सांगितले आहे. मात्र अद्याप 11 मे 2020 ही तारिख निश्चित नसल्याचे सांगितले.

गुरुवारी लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात नीरव मोदीच्या जामीनावर सुनावणी होती. त्या सुनावणीला तो वांड्सवर्थ तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याच्या कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या