#Nirbhaya दोषी विनयने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केले जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय सिंगने त्याचे डोके भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी केले आहे. पोलिसांनी वेळीच त्याला अडवल्याने तो गंभीर जखमी झाला नाही. मात्र त्याच्या कपाळाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. विनयने त्याची फाशी पुढे ढकलण्यासाठी असे केले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना येत्या 3 मार्चला फासावर लटकविण्यात येणार आहे. फाशी रोखण्यासाठी त्यांनी अनेकदा कायद्यातील पळवाटांचा वापर केला. त्यानुसार दोनदा त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली. मात्र आता त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. त्यामुळे त्यांनी आता फाशीची तारिख पुढे ढकलण्यासाठी नवनवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी हे सर्व दोषी तिहार तुरुंगात उपोषणाला बसले होते.