निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल

474

बुधवार 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे.

या टीममध्ये 18 जवानांसोबत आणि 2 अधिकारी आहेत वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री आहे. ही टीम मंगळवारी येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे

दरम्यान तीन तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात सावधानतेच्या आणि घरी राहण्याच्या सूचना तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या