Nisarga cyclone – चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर अक्षय कुमारचे मुंबईकरांना आवाहन

1008

मुंबईच्या किनारपट्टीवर काही तासातच निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिका, सरकार या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने देखील जनतेसाठी एक व्हिडीओ संदेश दिला आहे.

अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बाहेर पाऊस पडतोय. दरवर्षी पावसाळ्याची आपण वाट पाहत असतो. पण हे 2020 वर्ष काही वेगळे आहे. विचित्र वर्ष आहे हे. राहून राहून सतवत आहे. पावसाची मजा देखील निवांतपणे घेऊ देत नाहीए. रिमझिम पावसाच्या मागून चक्रीवादळ देखील येत आहे. पण देवाची कृपा झाली तर वादळ येणारही नाही. कदाचित त्याचा वेग कमी असेल. पण आलंच तरी आपण मुंबईकर घाबरणाऱ्यातले नाही. बीएमसी आपल्या सुरक्षेसाठी काम करतेय. त्यांची पूर्ण लिस्ट तयार आहे. आपण फक्त नियमांचे पालन करायचे आहे. घरातून बाहेर पड़ायचे नाही, झाडाखाली थाांबू नका, गरज नसेल तर गॅस इलेक्ट्रिसिटी बंद ठेवा, मेणबत्ती, टॉर्च, खाण्याचे पदार्थ तयार ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, बीएमसीला १९१६ ला फोन करून मदत मागू शकता. सर्व नियम पाळा. सर्वात महत्त्वाचं घाबरू नका. हे फक्त वादळ आहे. तुमच्या मदतीने हे संकट देखील पार करू’, असे आवाहन अक्षयने व्हिडीओतून केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या